तीन युवतींचा विनयभंग
By Admin | Published: March 13, 2016 11:38 PM2016-03-13T23:38:41+5:302016-03-13T23:58:54+5:30
अहमदनगर : शहरात युवती आणि महिलांचा विनयभंग केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : शहरात युवती आणि महिलांचा विनयभंग केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग करणाऱ्या एका युवकाला रविवारी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
एका ४६ वर्षीय महिलेला शिवीगाळ, दमदाटी करून विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सर्जेपुरा चौकात घडली. या प्रकरणी सूर्यकांत गोफणे, मंदाकिनी सूर्यकांत गोफणे, रवींद्र उर्फ सोन्या सूर्यकांत गोफणे, सागर सूर्यकांत गोफणे (रा. सर्जेपुरा चौक) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्जेपुरा येथील घरातून राधाबाई काळे महाविद्यालयात जात असलेल्या १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २६ फेब्रुवारीला साहिल जहागीरदार जमील (रा. सर्जेपुरा) याने कॉलेजला पायी जात असलेल्या युवतीला दुचाकीवर बसवून ‘तुझ्याशी लग्न करायचे आहे’, असे सांगून चांदबिबी महालावर नेले. मोबाईलमध्ये फोटो काढून बदनामी करण्याची धमकी दिली. तिथे युवतीने आरडाओरडा केल्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आणून सोडले. या प्रकरणी जमील याला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे.
वाळुंज शिवारात एका २० वर्षीय युवतीचा शनिवारी विनयभंग झाला. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र गंगाराम गायकवाड (रा. वाळुंज) याच्याविरुद्ध विनयभंगाचा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिरीवर पाणी भरीत असताना ‘तुझ्याशी बोलायचे आहे’, असे सांगत गायकवाड याने युवतीचा विनयभंग केला.(प्रतिनिधी)