विनयभंग करणा-या  आरोपीस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 06:34 PM2019-03-03T18:34:33+5:302019-03-03T18:34:36+5:30

मुलीचा विनयभंग करून तिच्या आईवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़

Molested convict | विनयभंग करणा-या  आरोपीस सक्तमजुरी

विनयभंग करणा-या  आरोपीस सक्तमजुरी

अहमदनगर: मुलीचा विनयभंग करून तिच्या आईवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला़
भास्कर गंगाराम भुजबळ (वय ७०रा़ भांडगाव ता़ पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे़ आरोपी भुजबळ याने २६ नोव्हेंबर २०१७ रोजी शेतात काम करत असलेल्या मुलीचा विनयभंग केला़ याबाबत सदर मुलीच्या आईलने आरोपीस जाब विचारला तेव्हा त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला़ याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती़ या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ अनिल घोडके यांनी काम पाहिले़ फिर्यादी पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले़ समोर आलेले पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली़

 

Web Title: Molested convict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.