लग्न सोहळ्यातून पैसे, दागिने चोरणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:36 AM2021-02-18T04:36:30+5:302021-02-18T04:36:30+5:30
गोलू सुमेर झोजा उर्फ सिसोदिया (वय २५), संदीप सुमेर झोजा उर्फ सिसोदिया (वय १९), राधेशाम उदयराम राजपूत उर्फ ठाकूर ...
गोलू सुमेर झोजा उर्फ सिसोदिया (वय २५), संदीप सुमेर झोजा उर्फ सिसोदिया (वय १९), राधेशाम उदयराम राजपूत उर्फ ठाकूर (वय ३०), बिपीन राजपाल सिंग (वय २१), गिरिराज दिनेशचंद शुक्ला (वय २५), अनिल कमल सिसोदिया (वय ३० सर्व रा.जि. देवास मध्यप्रेदश), विशालकुमार बनी सिंग (वय १९रा.रोशननगर हरियाण) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या टोळीने १ डिसेंबर २०२० रोजी शिर्डी येथे लग्नसोहळ्यातून दीड लाख रुपये रोख चोरून नेले होते. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात अनिलकुमार उपाध्याय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्ह्यात अशा स्वरुपाच्या वारंवार घटना घडत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेकर, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोलीस नाईक संदीप पवार, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप दरंदले यांच्या पथकाने मध्यप्रदेशात शोध घेत आरेापींना अटक केली.
या आरोपींकडून रोख ५५ हजार दोन वाहने असा एकूण २३ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपाधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
इतर ठिकाणचे गुन्हे येणार समोर
लग्नसोहळ्यात पाहुणे म्हणून प्रवेश करून संधी मिळताच पैसे किंवा दागिने चोरने अशी, या टोळीचे गुन्ह्याची पद्धत आहे. या टोळीने महाराष्ट्रातील जिल्ह्यात अशा पद्धतीने चोरी केली असून, याबाबत शिर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.
फोटो १७ एलसीबी
ओळी- लग्न सोहळ्यातून दागिने व पैसे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली.