दीड महिन्यातच दूरगावचा तलाव कोरडाठाक; शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 12:02 PM2020-06-07T12:02:28+5:302020-06-07T13:02:54+5:30
गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतीसाठी सोडण्यात आलेल्या कुकडीच्या आवर्तनातून कर्जत तालुक्यातील दुरगाव तलाव सुमारे ८० टक्के भरला होता. परंतु या तलावामधील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात नियमित उपसा होत असल्याने अवघ्या काही दिवसातच हा पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे.
कुळधरण : गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतीसाठी सोडण्यात आलेल्या कुकडीच्या आवर्तनातून कर्जत तालुक्यातील दुरगाव तलाव सुमारे ८० टक्के भरला होता. परंतु या तलावामधील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात नियमित उपसा होत असल्याने अवघ्या काही दिवसातच हा पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे.
सध्या दूरगावच्या तलावात पाण्याचा एक थेंब ही दिसत नाही. यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात आली आहे. दुरगाव व कुळधरण परिसरातील एकूण तेराशे एकरावरील शेतीचे क्षेत्र या तलावामुळे ओलिताखाली येते.
पूर्वी या तलावावर ओलिताखालील खूप कमी क्षेत्र होते. यामुळे हा जलाशय आटत नव्हता. मात्र आता या तलावखालील ओलिताखाली क्षेत्र वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उपसा होते. त्यामुळे यंदा हा तलाव कोरडाठाक पडला आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तलाव कोरडा पडल्याने पिके सुकू लागली आहेत. कुकडीचे आवर्तन अजूनही सुटले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तरी कुकडीच्या आवर्तनातून दूरगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरुन द्यावा, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे