आशा सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:25+5:302021-06-16T04:29:25+5:30
नेवासा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून तालुकाध्यक्ष शारदा काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास प्रारंभ झाला. संघटनेच्या मागण्यांबाबत मोर्चामध्ये घोषणा ...
नेवासा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून तालुकाध्यक्ष शारदा काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास प्रारंभ झाला. संघटनेच्या मागण्यांबाबत मोर्चामध्ये घोषणा देण्यात आल्या. यावेळी आशा सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका यांना कोविडचे काम करण्याबाबत दरमहा एक हजार व गट प्रवर्तक यांना पाचशे रुपये भत्ता देण्यात येत होता, तो मार्च महिन्यानंतर देण्यात आलेला नाही. महानगरपालिकेमधील कोविडचे काम करण्यासाठी दररोज आशांना यापूर्वी तीनशे रुपये मोबदला दिला; मात्र मार्चपासून तो दिला नाही. तो कमीत कमी पाचशे रुपये दरमहा देण्यात यावा, अनेक ग्रामपंचायती एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देतात, परंतु अनेक ठिकाणी तो दिला जात नाही. नागरी व ग्रामीण भागातील आशांना व गट प्रवर्तकांना कोणताही भेदभाव न करता दररोज तीनशे रुपये देण्यात आला पाहिजे. आशा वर्कर यांना १८ हजार वेतन व गट प्रवर्तक यांना २१ हजार रुपये दरमहा पगार द्यावा. आशा व गटप्रवर्तकावर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कडक योजना करुन कडक शासन करावे, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी कॉ. आप्पासाहेब वाबळे, कॉ. शरद आरगडे, कॉ. स्मिता पानसरे, तालुकाध्यक्ष शारदा काळे यांची भाषणे झाली. सुरेखा शेजूळ, आशा गायकवाड, मनीषा भाकरे, माधुरी सोनवणे, वैशाली थोरात, उषा शिर्के, नलिनी जपे, नंदा माकोने, सुनीता गारुळे, ज्योती रोडे, प्रिया भोसे, मंगल नगरे, वनिता पटारे, सुनीता चावरे यांच्यासह आशा सेविका व प्रवर्तक संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.
..........
१५ नेवासा आशा आंदोलन