राहुरीत बंद पाळून तहसीलवर मोर्चा : तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:31 PM2019-03-05T18:31:11+5:302019-03-05T18:31:16+5:30
संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने ५ मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राहुरीत चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
राहुरी : संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने ५ मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राहुरीत चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. समितीच्या वतीने तहसीलदार फसेउद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले.
संविधान विरोधी दहा टक्के आर्थिक आधारावर दिलेले आरक्षण, विद्यापीठात तेरा पॉइंट रोस्टर प्रणाली लागू करुन संविधानिक हक्क नष्ट करणे, ईव्हीएम मशीनला लावण्यात आलेल्या पेपर ट्रेल मशीनमधील चिठ्ठी गिनती न करणे हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उलंघन आहे. जातीनिहाय जनगनणा करुन शंभर टक्के आरक्षण लागू करा. अकरा लाख आदिवासींचे शासनाने केलेले विस्थापन आदी मुद्यांना विरोध करण्यासाठी ५ मार्च रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. याप्रसंगी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी राहुरी बस स्थानक येथून शहरात फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. नंतर रॅली तहसील कार्यालय येथे आली असता सभेत रुपांतर झाले. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजप सरकार सत्तेवर येत आहे, असे प्रतिपादन यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी केले. याप्रसंगी प्रशांत शिंदे, कांतीलाल जगधने, विजय तमनर, अरुण डोंगरे, मच्छिंद्र गुंड, संजय संसारे, बाळासाहेब जाधव आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निलेश जगधने, संदीप कोकाटे, सचिन पवार, राजू खोजे, राजा भोरे, रमेश गायकवाड, अतुल पवार, राजेश पवार, अमर सातुरे, सुनील तनपुरे, अशोक तुपे, फिरोज शेख, मच्छिंद्र गुलदगड, अब्दुलभाई आतार, निसारमामु पिंजारी, विजय अडांगळे, गणेश पवार, चंद्रकांत जाधव, युवराज पारडे उपस्थित होते.