चार लाख टनापेक्षा जास्त युरियाचा पुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:19 AM2020-12-29T04:19:51+5:302020-12-29T04:19:51+5:30

कोपरगाव: कृपक भारती सहकारी संस्थेने (कृभको) महाराष्ट्रातील युरियाची गरज लक्षात घेऊन मागील वर्षीच्या तुलनेत चार लाख मेट्रिक टनापेक्षा ...

More than four lakh tonnes of urea should be supplied | चार लाख टनापेक्षा जास्त युरियाचा पुरवठा करावा

चार लाख टनापेक्षा जास्त युरियाचा पुरवठा करावा

कोपरगाव: कृपक भारती सहकारी संस्थेने (कृभको) महाराष्ट्रातील युरियाची गरज लक्षात घेऊन मागील वर्षीच्या तुलनेत चार लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त युरियाचा पुरवठा करावा, अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली आहे.

नवी दिल्ली येथे कृभकोचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी कृभकोचे व्यवस्थापकीय संचालक राजन चौधरी यांनी प्रास्ताविक केले. देशभरातून कृभकोचे सुमारे ६० ठिकाणांहून या बैठकीसाठी सदस्य जोडले गेले होते. नागपूर, पुणे आणि कोपरगाव या ठिकाणी महाराप्ट्रातील प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. कोपरगाव येथे झालेल्या या सभेसाठी जनरल बाॅडी प्रतिनिधी रामनाथ चिंधू पाटील, भगवानराव काजे, पराग संधान, डी. पी. मोरे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, टी.आर. कानवडे, कृभकोचे अधिकारी धनाजी देशमुख, सुदर्शन पाटील व शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक हरिभाऊ गोरे उपस्थित होते.

मागील वर्षात कृभकोने ४ लाख मेट्रिक टन युरियाचा पुरवठा महाराष्ट्र्राकरिता केला होता; परंतु यावर्षी १ लाख ८५ हजार मेट्रिक टन इतका पुरवठा केलेला आहे. त्यामध्ये वाढ करून मागील वर्षाप्रमाणे महाराष्ट्र्रासाठी युरियाचा तुटवडा लक्षात घेऊन कृभकोने याही वर्षी ४ लाख मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करावा. त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या कंपोस्ट खताचा ५ हजार मेट्रिक टन पुरवठा केला होता. त्यात वाढ करून यावर्षी कंपोस्ट खते १० हजार मेट्रिक टन पुरविण्यात यावी, अशी मागणी प्रतिनिधींनी केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह यादव यांनी कृभको सभासद संस्थांकरिता १५ टक्के लाभांशाची घोषणा करून महाराष्ट्रकरिता झालेल्या युरियाच्या मागणीसंदर्भात अनुकूलता दर्शविली आहे. मागील वर्षाच्या मिश्रखताच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याने समाधान व्यक्त केले.

......................

फोटो२८-बिपीन कोल्हे सभा

..

ओळी-कृभकोच्या ऑनलाइन सभेत बोलताना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे.

Web Title: More than four lakh tonnes of urea should be supplied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.