विलगीकरण कक्षाच्या परिसरात मोकाट फिरणारे जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:21 AM2021-05-21T04:21:53+5:302021-05-21T04:21:53+5:30
पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील ज्याची चाचणी पॉझिटिव्ह आली व सौम्य लक्षणे आहेत, अशांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ...
पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील ज्याची चाचणी पॉझिटिव्ह आली व सौम्य लक्षणे आहेत, अशांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन खोल्यांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली असली, तरी या परिसरात गावातील मोकाट फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
पुणतांबा येथील वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा व कोरोनाची साखळी तुटावी, याकरिता जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील नवीन इमारतीच्या खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले असून, त्यात पॉझिटिव्ह आलेले गावातील महिला व पुरुष अशा चौदाजणांना ठेवण्यात आले आहे. याठिकाणी पॉझिटिव्ह असलेल्यांना ठेवलेले असताना या विलगीकरण कक्ष परिसरात गावातील मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याने कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
........
ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे व सौम्य लक्षणे आहेत, अशांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. रोजच्या चाचणीमध्ये एक किंवा दोन बाधित सापडत आहेत.
- डॉ. कुंदन गायकवाड