आगीच्या वणव्यात रस्त्याच्या बाजूची ४० पेक्षाजास्त झाडं होरपळली; कोपरगावतील घटना
By रोहित टेके | Updated: April 20, 2023 12:16 IST2023-04-20T12:15:34+5:302023-04-20T12:16:22+5:30
शेकडोच्या संखेतील झाडे डामाडौलात उभी आहे.

आगीच्या वणव्यात रस्त्याच्या बाजूची ४० पेक्षाजास्त झाडं होरपळली; कोपरगावतील घटना
कोपरगाव ( जि. अहमदनगर ) : तालुक्यातील संवत्सर - कान्हेगाव रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरवीगार ४० पेक्षाजास्त झाडं आगीत होरपळली आहेत. ही घटना समृद्धी महामार्गाच्या लगत घडली असून रस्त्याने रहदारी कमी असल्याने गुरुवारी समोर आली आहे. पंधरा वर्षांपूर्वी या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम करण्यात आले होते. त्यावेळी या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागामार्फत झाडांची लागवड करण्यात आली होती. शेकडोच्या संखेतील झाडे डामाडौलात उभी आहे.
सद्यस्थितीतही उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या झाडांच्या खाली वाळलेल्या गवतासह पालापाचोळ्याने पेट घेतल्याने जवळपास शंभर फूटापेक्षा जास्तअंतर लागलेल्या आगीच्या वनव्यात ही झाडे होरपळल्याने झाडांची पाने पिवळी पडली आहे. दरम्यान, ही आग कोणी खोडसाळ वृत्तीने लावली की इतर कारणांमुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची होरपळ झाल्याने वृक्षप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.