मुलीला बेवारस सोडणारी माता परतली ! या कारणामुळं सोडलं होतं साई दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 04:42 PM2019-06-02T16:42:13+5:302019-06-02T16:52:01+5:30

दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या मुलीला साई दरबारी सोडून गेलेली तिची आई मातृप्रेमापोटी तिला बघायला परत आली. मात्र तिने मुलीला नेण्यास नकार दिला असल्याने पेच तयार झाला आहे.

 Mother abandoned mother's daughter ... This was due to the reason Sai Darbari left | मुलीला बेवारस सोडणारी माता परतली ! या कारणामुळं सोडलं होतं साई दरबारी

मुलीला बेवारस सोडणारी माता परतली ! या कारणामुळं सोडलं होतं साई दरबारी

शिर्डी : दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या मुलीला साई दरबारी सोडून गेलेली तिची आई मातृप्रेमापोटी तिला बघायला परत आली. मात्र तिने मुलीला नेण्यास नकार दिला असल्याने पेच तयार झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळ तालुक्यातील या मातेचा एरंडोल तालुक्यातील एका गावातील तरुणाशी झाला होता. या दोघांना एक सात वर्षाची आणखी एक मुलगी आहे. दरम्यान पतीशी वाद झाल्याने ही महिला मामाकडे राहू लागली. मामा या महिलेचे दुसरे लग्न लावून देणार होता. दरम्यानच्या काळात या महिलेचे एकाशी प्रेमसंबध जुळले. त्यातून तिला एक मुलगी झाली. प्रियकर विवाहित असल्याने तो महिलेला, तसेच मुलीला घरात घेईना. पती महिलेला घरात घ्यायला तयार झाला पण मुलीचा स्वीकार करत नव्हता. या पेचातून मार्ग काढण्यासाठी, आपल्या सुखातील अडसर दूर करण्यासाठी या महिलेने या सहा महिन्यांच्या चिमुकलीला ३१ मे रोजी सकाळी थेट साईदरबारी सोडून पोबारा केला.
मात्र तीचे आईचे हृदय स्वस्थ बसू देईना. त्यामुळे काल शनिवारी रात्री मुलीला बघण्यासाठी ती तडक साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कार्यालयात येऊन धडकली. सुरक्षा रक्षकांनी तिची रवानगी पोलिसांकडे केली.
पोलिसांनी त्या लहानगीची रवानगी नगरच्या चाईल्ड होममध्ये केली आहे. या महिलेने केलेल्या नात्याच्या गुंतागुंतीमुळे सहा महिन्यांच्या निष्पाप जीवाच्या नशिबी फरफट आली आहे. दरम्यान या महिलेने पोलिसांशी बोलतांना मुलीला परत नेण्याची तयारी दर्शवली आहे. पोलीस तिच्या सांगण्यातील व नात्याची सत्यता पडताळून पाहत आहेत. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करू, असे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सांगितले.

मी फक्त माझ्या मुलीची व्यवस्था लागली की नाही हे बघण्यासाठी आले आहे. तिला अनाथाश्रमात देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. तिला चांगल्या अनाथाश्रमात घाला किंवा कोणीतरी नाव देऊन दत्तक घ्या अशी विनवणी या महिलेने माध्यमांशी बोलताना केली.
 

Web Title:  Mother abandoned mother's daughter ... This was due to the reason Sai Darbari left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.