अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आईला मारहाण
By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:30+5:302020-12-05T04:33:30+5:30
कोपरगाव : दुकानावर येणाऱ्या लोकांना बोलावून आमची बदनामी करीत असल्याच्या रागातून तिघांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईला ...
कोपरगाव : दुकानावर येणाऱ्या लोकांना बोलावून आमची बदनामी करीत असल्याच्या रागातून तिघांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईला लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कोपरगाव येथे बुधवारी ( दि. २) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दिलीप कदम, दीपक दिलीप कदम, सचिन दिलीप कदम (तिघे रा. येसगाव ता. कोपरगाव ) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वरील तीनही आरोपींना अटक केली. या प्रकणाचा अधिक तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.