पैसे न दिल्याने आई, लहान भावाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:33+5:302021-06-30T04:14:33+5:30
या मारहाणीत लहान भावाचा पाय फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी सोमवारी (दि. २८) रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या ...
या मारहाणीत लहान भावाचा पाय फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी सोमवारी (दि. २८) रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या मोठ्या मुलाविरोधात आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कैलास नामदेव कुदनर (वय २५, रा. पिंपळगाव देपा, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या मोठ्या मुलाचे नाव आहे. त्याच्याविरोधात त्याची आई बायजाबाई नामदेव कुदनर (रा. पिंपळगाव देपा, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल नामदेव कुदनर असे जखमी झालेल्या लहान भावाचे नाव आहे. कैलास कुदनर याने त्याची आई बायजाबाई यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांनी रुपये न दिल्याच्या कारणावरून त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर आई व लहान भावाला लाथाबुक्यांनी, घरातील लोखंडी पाईपने मारहाण केली. लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत लहान भाऊ अमोल याचा पाय फ्रॅक्चर झाला. फिर्यादी महिला ही निरक्षर असल्याने हा वाद कौटुंबिक आहे असे समजून तिने याबाबत कुणाला काही सांगितले नाही. मात्र, नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस हेड कॉस्टेबल एस.डी. टकले अधिक तपास करीत आहेत.