बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविले मुलाचे प्राण,संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावच्या महादेव वस्तीवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:58 PM2020-04-20T17:58:11+5:302020-04-20T17:58:19+5:30

  संगमनेर : पायात भरलेला काटा काढण्यासाठी खाली वाकलेल्या सात वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला शेतात ओढत नेले. या मुलाच्या आईने बिबट्याच्या मागे धाव घेत आरडाओरड सुरू केली. बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडवत त्याचे प्राण वाचविले. ही घटना रविवारी (१९ मार्च) रात्री नऊ च्या सुमारास तालुक्यातील सुकेवाडी गावच्या शिवारात महादेव वस्ती येथे घडली.

Mother rescues baby's life | बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविले मुलाचे प्राण,संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावच्या महादेव वस्तीवरील घटना

बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविले मुलाचे प्राण,संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावच्या महादेव वस्तीवरील घटना

  संगमनेर : पायात भरलेला काटा काढण्यासाठी खाली वाकलेल्या सात वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला शेतात ओढत नेले. या मुलाच्या आईने बिबट्याच्या मागे धाव घेत आरडाओरड सुरू केली. बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडवत त्याचे प्राण वाचविले. ही घटना रविवारी (१९ मार्च) रात्री नऊ च्या सुमारास तालुक्यातील सुकेवाडी गावच्या शिवारात महादेव वस्ती येथे घडली.
    सुनिल नामदेव चव्हाण असे बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या मुलाचे तर सुरेखा चव्हाण असे या मुलाच्या आईचे नाव आहे. सुनिलला शौचास लागल्याने सुरेखा या त्याला घेऊन घराबाहेर गेल्या होत्या. येताना सुनिलच्या पायात काटा भरला, तो काढण्यासाठी खाली वाकलेल्या सुनिलवर झाडाझुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. जबड्यात त्याची मान धरत जवळच असलेल्या शेतात ओढत नेले.
    बिबट्या मुलाला जबड्यात धरून नेत असल्याचे पाहिल्यानंतर सुरेखा यांनी त्याच्या मागे
धाव घेत मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिक  आवाजाच्या दिशेने धावत गेले. नागरिकांच्या ओरडण्याच्या आवाजाने बिबट्याने सुनिलला तेथेच टाकून पळ काढला. सुनिलची मान, हात, पाय व पोटाला बिबट्याचे दात व नखे खोलवर लागल्याने जखमा होवून त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. गंभीर जखमी झालेल्या सुनिलला उपचारार्थ शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनपाल अंबादास मेहेत्रे, प्रशांत पुंड यांनी तात्काळ रूग्णालयात व घटनास्थळी भेट दिली. सुनिलची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांच्या मागणीवरून परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.
--------------
फोटो 
बट्याच्या हल्यात जखमी झालेला सुनिल चव्हाण.
ओळ : बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात लावण्यात आलेला पिंजरा. 

Web Title: Mother rescues baby's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.