माउलीच्या समर्पित कार्यात मातेची ममता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:25 AM2021-08-28T04:25:46+5:302021-08-28T04:25:46+5:30
नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील माउली संस्थेत उभारण्यात येणारे रुग्णालय व संशोधन संस्थेच्या कामाचा शुभारंभप्रसंगी तनपुरे बोलत होत्या. अमेरिकास्थित ...
नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील माउली संस्थेत उभारण्यात येणारे रुग्णालय व संशोधन संस्थेच्या कामाचा शुभारंभप्रसंगी तनपुरे बोलत होत्या. अमेरिकास्थित नीलू निरंजना गवाणकर यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली संस्थेतर्फे एन. एन. जी. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, न्युरोसायन्सेस अँड कार्डियालॉजी या अभिमत इन्स्टिट्यूटच्या उच्चशिक्षण, संशोधन व उपचारासाठी समर्पित रुग्णालय व संशोधन संस्थेचे भूमिपूजन प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण जयंत नारळीकर यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी पार पडले होते. आता प्रत्यक्षातील बांधकामाची सुरुवात नीलू निरंजना गवाणकर यांच्या उपस्थितीत झाली.
एन. एन. जी. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, न्युरोसायन्स ॲण्ड कार्डियालॉजी हे निर्माणाधीन अभिमत इन्स्टिट्यूट आंतरराष्टीय पातळीवरील एक मानाचे पान होणार आहे. हे अशा धर्मादाय स्वरूपाचे भारतातील पहिले रुग्णालय व संशोधन केंद्र सुरू होते आहे. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. संदीप सुराणा, डॉ. कुंदा धुळे, आबाजी व मेघमालाताई पठारे, ज्येष्ठ सनदी लेखापाल अशोक गुर्जर व प्रकल्पाचे वास्तुविशारद संजय सोवनी, पोलीस उपअधीक्षक मनीषा पाटील आदी उपस्थित होते.
.....................
फोटो २७ माऊली
ओळी- माउली संस्थेत उभारण्यात येणारे रुग्णालय व संशोधन संस्थेच्या कामाचा शुभारंभप्रसंसंगी नीलू गवाणकर, डॉ. उषाताई तनपुरे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. राजेंद्र धामने आदी.