नगरमध्ये मोटारसायकल चोर सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:12 PM2018-06-19T18:12:24+5:302018-06-19T18:12:35+5:30
नगर शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून गेल्या पाच महिन्यांत ७३ मोटारसायकलची चोरी असून, यातील केवळ ९ गुन्हे उघडकिस आले आहेत.
अहमदनगर: नगर शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला आहे़ कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून गेल्या पाच महिन्यांत ७३ मोटारसायकलची चोरी असून, यातील केवळ ९ गुन्हे उघडकिस आले आहेत.
मोटारसायकल चोरांच्या टोळ्या पकडण्यात पोलीसांना मात्र अपयश येताना दिसत आहे. विविध शासकीय खासगी कार्यालयांसह इतर गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या दुचाकी चोरांमध्ये नगर शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी टोळ्या कार्यरत आहेत. बहुतांशी जणांच्या मोटारसायकलला केवळ हॅडेल लॉक असतो. हा लॉक काही क्षणात तोडून बनावट चावी लावून दुचाकी पळविली जाते. जिल्हा न्यायालयाच्या आवारातूनही दुचाकी चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकी चोरणाऱ्यांमध्ये तरूणांसह अल्पवयीन मुलांचेही प्रमाण जास्त आहे. व्यसन आणि एैयाशीसाठी तरूण मुले वाहन चोरीचा गुन्हा करत असल्याचे समोर आले आहे. चोरलेल्या मोटारसायकली भंगारात अथवा एखाद्या ग्राहकाला कमी किमतीत विकल्या जातात. चोरी जाण्याच्या भितीमुळे बहुतांशी जणांनी मोटारसायकलच्या पुढील चाकाला लॉक बसवून घेतला आहे.
२६७ चोरी ३३ उडघकिस
नगर शहरातील तीन पोलीस ठाणे हद्दीत २०१७ या वर्षात २६७ मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. यातील केवळ ३३ गुन्हे उघडकिस आले आहेत. शहरात होणारी चैनस्रॅचिंगच्या घटना कमी झाल्या असल्या तरी दुचाकी चोरांच्या टोळ्यांना पकडणे पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
पोलीस ठाणे निहाय मोटारसायकलींची चोरी (मागील पाच महिने)
भिंगार कॅम्प १४
तोफखाना २२
कोतवाली ३७
दुचाकी चोरांना शोध्याचे काम सुरू आहे़ मागील आठवड्यात तोफखाना पोलीसांनी काही दुचाकी चोरांना अटक केली. आपली दुचाकी चोरी जाऊ नये म्हणून नागरिकांनाही दक्षता घ्यावी.
डॉ. अक्षय शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक