द्वारकामाईचे दरवाजे न उघडल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:04+5:302021-02-07T04:20:04+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने साईमंदिरासह द्वारकामाई दर्शनासाठी बंद ठेवली होती. शासनाच्या आदेशानंतर मंदिर खुले झाले मात्र गर्दी टाळण्याचे कारण पुढे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने साईमंदिरासह द्वारकामाई दर्शनासाठी बंद ठेवली होती. शासनाच्या आदेशानंतर मंदिर खुले झाले मात्र गर्दी टाळण्याचे कारण पुढे करत मंदिर प्रशासनाने द्वारकामाईचे मुख्य प्रवेशद्वार अद्याप बंदच ठेवले आहे. लाखो भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांची द्वारकामाईत श्रद्धा जोडली गेली आहे. समाधी मंदिराअगोदर शिर्डीकर द्वारकामाईचे दर्शन घेतात. या ठिकाणीच जवळपास सर्व भाविक आरती करतात मात्र लॉकडाऊननंतर द्वारकामाईचे द्वार अद्याप उघडले नाही. शासनाने सर्व मंदिर खुले करण्याचे आदेश दिले असताना संस्थान प्रशासन केवळ समाधी मंदिर उघडते मात्र अन्य मंदिराचे दर्शन अद्याप बंदच आहे.
संस्थान प्रशासनाने सहनशीलतेचा अंत न पाहता द्वारकामाईचे दरवाजे खुले करावे अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाती परदेशी यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.