कर्जतमध्ये आंदोलन चिघळले : धक्काबुक्की, दगडफेक : ३ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:17 PM2018-12-21T13:17:36+5:302018-12-21T13:18:00+5:30

तौसिफ शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Movement in Karjat: The Statewide agitation on January 3 | कर्जतमध्ये आंदोलन चिघळले : धक्काबुक्की, दगडफेक : ३ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन

कर्जतमध्ये आंदोलन चिघळले : धक्काबुक्की, दगडफेक : ३ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन

अहमदनगर/कर्जत : तौसिफ शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी कर्जतमध्ये आंदोलनकर्ते संतप्त झाले. कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी साजीद पिजारी यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली तर काही आंदोलकांनी दगडफेकही केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास ३ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची भुमिका आंदोलकांनी घेतली.
अहमदनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्या. तौसिफ शेख मुत्यूप्रकरणी कर्जतचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांची अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे करण्यात आली. पोलिस अधीक्षकांनाही मुस्लिम समाजाने निवेदन दिले.

Web Title: Movement in Karjat: The Statewide agitation on January 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.