नगरपंचायतीसाठी हालचाली

By Admin | Published: May 21, 2014 11:34 PM2014-05-21T23:34:22+5:302014-05-21T23:59:04+5:30

पारनेर : तालुक्याचे गाव असलेल्या पारनेरला नगरपंचायत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Movement for Nagar Panchayat | नगरपंचायतीसाठी हालचाली

नगरपंचायतीसाठी हालचाली

पारनेर : तालुक्याचे गाव असलेल्या पारनेरला नगरपंचायत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पारनेरजवळील कोणत्या वाड्या, वस्त्या जोडायच्या, घरांची संख्या किती यासह इतर माहिती संकलन करणे जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. शुक्रवारी हरकतींची सुनावणी होणार आहे. दरम्यान, पारनेर येथे नगरपंचायतीस विरोध कायम आहे. प्रत्येक तालुक्याच्या गावी नगरपंचायत किंवा नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार मागील महिन्यात याबाबत हरकती नोंदविण्यास मुदत देण्यात आली होती. आचारसंहितेमुळे पारनेर ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेऊन विरोध नोंदविता आला नाही. नंतर सरपंच अण्णासाहेब औटी, उपसरपंच नंदकुमार देशमुख यांनी पुढाकर घेऊन नगरपंचायतला ग्रामस्थांचा विरोध असल्याच्या हरकती जिल्हाधिकार्‍यांकडे नोंदविल्या होत्या. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर नगरपंचायत होण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर नगरपंचायतीसाठी असणारी आवश्यक माहिती मागितली आहे. यामध्ये पारनेर ग्रामपंचायत अंतर्गंत क्षेत्रफळ, लोकसंख्या, घरांची संख्या याविषयीची माहिती मागविली आहे. तसेच सोबलेवाडी, बुगेवाडी, कुंभारवाडी, तराळवाडी,कन्हेरओहोळ, शनीमळा, पुजारमळा, पुणेवाडी फाटा, महाजन मळा, वरखेड मळा, सिध्देश्वरवाडी फाटा यासह वाड्या, वस्त्यांची लोकवस्ती किती, अंतर याविषयीची माहिती ग्रामपंचायतीला द्यावी लागणार आहे. माहिती संकलित नगरपंचायतीत कोणती वाड्या, वस्ती समाविष्ट करावी लागतील त्यांचा ठराव घ्यावा लागेल ती महितीही संकलित केली जात आहे. आठवडाभरात ही माहिती मागविण्यात आहे. त्यामुळे हालचाली गतिमान आहेत. विधानसभेची आचारसंहितेपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. (तालुका प्रतिनिधी) हरकतींची शुक्रवारी सुनावणी नगरपंचायतीला पारनेर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विरोध करून हरकती नोंदविल्या आहेत. या हरकतींची सुनावणी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांकडे होणार आहे. या हरकतीं दाखल झाल्यानंतर पारनेरचे योगेश मते यांनी पारनेरमधून विरोधात हरकती नोंदविल्यानंतर पारनेरचे राष्ट्रवादीचे युवक नेते योगेश मते यांनी या हरकतींवरच हरकत घेतल्याने याबाबत काय निर्णय होतो याकडे पारनेरचे लक्ष लागून आहे. कर न परवडणारे पारनेरला सध्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगली कामे सुरू असून नगरपंचायतमुळे होणारी पाणीपट्टी व घरपट्टीची करवाढ यासह अनेक करांचा बोजा ग्रामस्थांना परवडणार नाही. त्यामुळे नगरपंचायतीला आमचा विरोध कायम आहे. अण्णासाहेब औटी,सरपंच नंदकुमार देशमुख उपसरपंच, पारनेर ग्रामपंचायत

Web Title: Movement for Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.