श्रीगोंद्यात नाभिक समाज संघटनेचे दोन ठिकाणी आंदोलन; दुकाने उघडण्याची मागणी; संघटनेत फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:25 AM2020-06-10T10:25:42+5:302020-06-10T10:26:38+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील नाभिक संघटना पदाधिकाºयातील मतभेद मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान उघडकीस आले. एका गटाने तहसील कार्यालयासमोर तर दुस-या गटाने संत सेनानी महाराज मंदिरात उपोषण केले. दोन्ही गटाने सलुनची दुकाने उघडण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.
श्रीगोंदा : तालुक्यातील नाभिक संघटना पदाधिका-यातील मतभेद मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान उघडकीस आले. एका गटाने तहसील कार्यालयासमोर तर दुस-या गटाने संत सेनानी महाराज मंदिरात उपोषण केले. दोन्ही गटाने सलुनची दुकाने उघडण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.
अजय रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिका-यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. जिल्हा परिषदेच्या सदस्या अनुराधा नागवडे यांनी फोनवरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. बाळासाहेब थोरात यांनी सलुनची दुकाने उघडण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर पदाधिकाºयांनी उपोषण मागे घेतले.
श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा, भाजपा नेते. राजेंद्र महस्के, लक्ष्मणराव नलगे स्मितल वाबळे, वामनराव भदे, सतिष पोखर्ण, नगरसेवक संतोष क्षीरसागर, नगरसेवक प्रशांत गोरे, प्रा.सुनील माने, अमोल अनभुले यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी प्रशासनाच्या वतीने श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नाभिक बांधव उपस्थित होते.
नाभिक समाजातील दुस-या गटाने सलून दुकान सुरु करण्यासंदर्भात संत सेनानी महाराज मंदिरात उपोषण केले. उपोषणास सतीश पोखर्णा, राजेश डांगे, चंदुशेठ कटारिया यांनी भेट दिली.
यावेळी आबासाहेब मोरे, काकासाहेब कदम, अशोकराव सांगळे, हौसराव पंडित, अनिल राऊत, संजय राऊत, लखन राऊत, विनोद राऊत हे उपोषणात सहभागी झाले होते.