संगमनेरात शिवसेनेचे आंदोलन; शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध
By शेखर पानसरे | Published: June 12, 2023 02:29 PM2023-06-12T14:29:49+5:302023-06-12T14:31:27+5:30
पोलिसांकडून वारकऱ्यांवर झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाचे संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली. सोमवारी (दि. १२) संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन अनेकांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेश माळवे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठार भाग तालुका प्रमुख संजय फड, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, दीपक वन्नम, वेणुगोपाल लाहोटी, शहर संघटक दीपक साळुंखे, शहर कार्याध्यक्ष अजीज मोमीन, विभाग प्रमुख विजय भागवत, संभव लोढा, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, उपतालुकाप्रमुख जनार्दन नागरे, सागर भागवत, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजय सातपुते, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शीतल हासे, संगीता गायकवाड, आशा केदारी, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख योगेश बिचकर, तालुकाप्रमुख सदाशिव हासे, सुदर्शन इटप, घुलेवाडी गटप्रमुख रविंद्र गिरी, शाखाप्रमुख नितीन अनाप, संतोष कुटे, शोएब शेख, माधव फुलमाळी, मुकेश कचरे, प्रशांत खजुरे, अर्जुन आमले, राजेंद्र लोणारी, माधव अवसक, चंदू भागवत आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
शहरप्रमुख कतारी यांनी सांगितले, आम्ही शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो. काल आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या दरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरुन वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने थोडी तरी लाज बाळगावी. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी. असेही कतारी यांनी सांगितले.