श्री इम्पेक्सन फर्निचर मॉलच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:18+5:302021-05-28T04:16:18+5:30

श्रीरामपूर : येथील श्री इम्पेक्स फर्निचर मॉल व सोशल सर्व्हिस फाउंडेशन यांच्या वतीने अविनाश कुदळे यांच्या पुढाकाराने गरजू कुटुंबीयांना ...

Of Mr. Impression Furniture Mall | श्री इम्पेक्सन फर्निचर मॉलच्या

श्री इम्पेक्सन फर्निचर मॉलच्या

श्रीरामपूर : येथील श्री इम्पेक्स फर्निचर मॉल व सोशल सर्व्हिस फाउंडेशन यांच्या वतीने अविनाश कुदळे यांच्या पुढाकाराने गरजू कुटुंबीयांना किराणा किटची मदत घरपोच करण्यात आली.

एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना आर्थिक फटका बसला. हातावर पोट असलेला कामगार वर्ग अडचणीत सापडला. एकीकडे कोरोनाचे थैमान असताना दुसरीकडे शहरातील दानशूनर मंडळी मदतीचे कार्य करीत आहेत.

श्री इम्पेक्स फर्निचर मॉलचे चालक अविनाश कुदळे यांनीही याकामी पुढाकार घेतला. शिक्षक नितीन यशवंत यांनी काही कुटुंबाची किराणा किटची जबाबदारी घेतली. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी श्रमदान करीत किराणा किट तयार केल्या. यामध्ये महिनाभर पुरेल इतके गहू, तांदुळ, साखर, डाळी, दैनंदिन गरजेचे साहित्य आहे. स्वयंसेवकांनी गरजूंची यादी तयार केली, कोरोना नियमाचे पालन करीत गरजवंतांच्या घरी जाऊन किट वाटप केले.

याप्रसंगी विजय छल्लारे, बबनराव तागड, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, सोशल सर्व्हिस फाउंडेशनचे उपाध्यक्ष गणेश करडे, श्री इम्पेक्सचे सहकारी व फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज सूर्यवंशी उपस्थित होते.

-------

Web Title: Of Mr. Impression Furniture Mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.