महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात घुसून मारहाण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:39 AM2022-03-27T05:39:04+5:302022-03-27T05:40:07+5:30

विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

MSEDCL engineer breaks into office, assault case filed | महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात घुसून मारहाण, गुन्हा दाखल

महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात घुसून मारहाण, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास दोघा सख्ख्या भावांनी कार्यालयात घुसून मारहाण केली. नगर तालुक्यातील अकोळनेर सबस्टेशन येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट (४०) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघा सख्ख्या भावांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजेच्या तारा तुटल्यामुळे अकोळनेर शिवारातील गणेश बेरड यांच्या मालकीचा गहू जळाला होता. तेथे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तारांऐवजी केबल टाकण्यास सांगितले होते. बेरड यांच्या शेजारी असलेले भोर यांनी त्याला विरोध केला. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अकोळनेर सबस्टेशन येथे जाऊन अभियंता बराट यांना जाब विचारला. बराट यांना शिवीगाळ, दमदाटी करून शर्टची कॉलर पकडून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

Web Title: MSEDCL engineer breaks into office, assault case filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.