विनामास्क फिरणाऱ्यांना मुकिंदपूर ग्रामपंचायतीचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:05+5:302021-06-26T04:16:05+5:30
करोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना आर्थिक दंड नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या व ...
करोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना आर्थिक दंड
नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या व कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मुकिंदपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी किंबहुना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सरपंच दादा निपुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत प्रशासनाकडून अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वेळोवेळी लॉकडाऊनही घोषित करण्यात आले. त्यालादेखील व्यापारी वर्गाकडून वेळोवेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही बेजबाबदार लोकांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीकडून विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून त्यांच्याकडून आर्थिक दंड वसूल करण्यात आला.
सरपंच दादा निपुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ग्रामविकास अधिकारी गणेश दुधाळे, कामगार तलाठी अण्णासाहेब दिघे, पोलीसपाटील आदेश साठे यांसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी गौरव निपुंगे, विशाल तिवारी, रमेश सरोदे, रमेश कांडके, कानिफनाथ उपळकर, वैभव मगर, कचरू डुकरे, स्वयंसेवक अक्षय देवखिळे यांनी सहभाग घेतला.
250621\img-20210625-wa0004.jpg
विनामास्क फिरणाऱ्यांना मुकिंदपूर ग्रामपंचायतीचा दणका