मुळा धरणातील मृतदेह २५ तासानंतर बाहेर; चक्कर आल्याने मिळाली होती जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 04:21 PM2020-02-23T16:21:28+5:302020-02-23T16:21:56+5:30
मुळा धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल २५ तासांनी पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव नानासाहेब रघुनाथ जाधव (वय-३५, रा. ठाकरवाडी) असे आहे.
राहुरी : मुळा धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल २५ तासांनी पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव नानासाहेब रघुनाथ जाधव (वय-३५, रा. ठाकरवाडी) असे आहे. चक्कर आल्याने पाण्यात पडून जाधव यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी सकाळी अकरा वाजता मुळा धरणाच्या जलाशयात जाळे टाकण्यासाठी नानासाहेब जाधव हे गेले होते़. जाळे टाकत असतांना त्यांना चक्कर आली. त्यामध्ये त्यांना जलसमाधी मिळाली़ मदत कार्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते. बारागाव नांदुर परिसरातील पोहणारे बाळासाहेब बर्डे, पोलीस पाटील शिवाजी केदारे, बाबासाहेब ढाकणे, बाबासाहेब वडीते, घमाजी जाधव, प्रभाकर गाडे यांनी मदत केली.
राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली़. मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.