मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 05:52 PM2019-08-08T17:52:14+5:302019-08-08T17:54:26+5:30
अहमदनगर ज्जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
राहुरी : अहमदनगर ज्जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. आमदार शिवाजी कर्डिले यांनी कळ दाबल्यानंतर मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले.
२६ टीएमसी क्षमता असलेल्या मुळा तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. त्यामुळे आज सायंकाळी ५ वाजता धरणातून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणा-या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणातून ११ मो-यातून पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे खाते पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेऊन असल्याचे मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.