मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो; पावसाचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:16 PM2019-10-20T18:16:43+5:302019-10-20T18:17:35+5:30
पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे़. यंदाच्या पावसाळ्यात तीनदा मुळा धरण ओव्हरप्लो झाले आहे़. १५ आॅक्टोबरनंतर मुळा धरणाच्या मो-यातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे़.
राहुरी : पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे़. यंदाच्या पावसाळ्यात तीनदा मुळा धरण ओव्हरप्लो झाले आहे़. १५ आॅक्टोबरनंतर मुळा धरणाच्या मो-यातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे़.
गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे़. दुपारी मुळा धरणाच्या मो-यावरून पाणी पडू लागले़. त्यामुळे मुळा धरणातून दुपारी दोन मो-यातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़. त्यानंतर ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे़. कोतूळ येथे अद्याप पावसाची नोंद झालेली नाही़. कोतूळ येथे यंदा ९९६ मिमी, मुळानगर येथे ४७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ६२८० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले़. डाव्या कालव्यातून ७९२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे़. याशिवाय मुळा धरणातून जायकवाडीकडे ३ हजार ८९६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलेले आहे़.
मुळा धरणाच्या तीन मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. यंदा पहिल्यांदाच १५ आॅगस्टपूर्वी मुळा धरण भरले होते़. मधल्या भागात पावसाने हजेरी लावल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे़. त्यामुळे नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे़. पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू आहे, असे मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.
बंधारे पूर्ण भरणार
मुळा नदीपात्रात असलेले बंधारे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते़. मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़. मुळा धरणात सध्या २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे़. बंधारे भरणार असल्याने नदीकाठी असलेल्या शेतीसाठी आवर्तन लाभदायक ठरणार आहे.