मुंबई-पुणे-नाशिक रेल्वेमार्गास मंजुरी,१८० किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:55 AM2020-06-16T11:55:47+5:302020-06-16T11:56:04+5:30
संगमनेर : नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणाच्या विकासात व औद्योगिकीकरणात मोलाची भर टाकणाºया नाशिक-पुणे रेल्वे महामार्गास केंद्र सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे, अशी माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली.

मुंबई-पुणे-नाशिक हा कॉरिडोअर अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. नाशिक-पुणे रेल्वे ही अत्यंत महत्वाची आहे.
यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे, डॉ.अमोल कोल्हे, नाशिकचे खासदार व या विभागातील पदाधिकाºयांनी सातत्याने पाठपुरावा केला.
या रेल्वे महामार्गामुळे नाशिक व पुणे ही महत्वाची शहरे जोडली
जाणार आहेत. या लोहमार्गाची
एकूण लांबी २३१.६७ किलोमीटर असून त्यापैकी १८० किलोमीटरचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर या भागातून हा रेल्वे महामार्ग निश्चित झालेला असून केंद्रीय मंत्रीमंडळाने त्यास नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे.
---------
राज्य सरकारही मंजुरी देणार
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची मंजुरी लवकर होणार आहे. कर्ज प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रकल्प खर्चास मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला प्रारंभ होणार आहे. शिर्डीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेसेवा यामुळे या भागात विकासाचे आणखी एक नवे पर्व सुरु होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात यांनी सांगितले.