मनपाच्या कंत्राटी अभियंत्याला मारहाण, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
By अण्णा नवथर | Updated: April 26, 2023 20:07 IST2023-04-26T20:06:43+5:302023-04-26T20:07:54+5:30
अभियंत्यास खड्डयात पाडून लाथाबुक्यांनी हाणले!

मनपाच्या कंत्राटी अभियंत्याला मारहाण, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: मेन लाईनवरील नळ कनेक्शन का तोडले, असे म्हणत महापालिकेच्या कंत्राटी अभियंत्यास खड्डयात पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना बोल्हेगाव येथील गणेश चौकात मंगळवारी ( दि. २५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. निखिल सुरशे गायकवाड ( रा. डॉनबास्को कॉलनी, सावेडी) असे मारहाण झालेल्या अभियंत्यांचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत पोपट सप्रे व त्याचा साथीदारविरोधात ( नाव माहिती) मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे कंत्राटी अभियंते गायकवाड यांच्यासह पथक मंगळवारी बोल्हेगाव येथील पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी सप्रे याने तु मेन लाईनवरील नळ कनेक्शन का तोडले. ते परत बसून दे, असे म्हणत दमदाटी केली. त्यावर अभियंते गायकवाड यांनी मेन लाईनवर कनेक्शन देता येणार नाही. सब लाईनवर उद्या कनेक्शन जोडून देतो, असे अभियता गायकवाड हे सप्रे यास म्हणाले. त्याचा राग येऊन सप्रे व त्याच्या साथीदाराने गायकवाड यांना खड्ड्यात पाडून लाथा बुक्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.