नगरमधील सर्वात मोठी कंपनी महापालिकेने काढली विकायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:28 PM2017-11-30T17:28:42+5:302017-11-30T17:30:00+5:30

महापालिकेने सध्या मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठीची मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेने आधी कंपनीला नोटीस दिली. त्यानंतर दिवाळीपूर्वीच कंपनीच्या आयटी विभागाला सील ठोकून मालमत्ता जप्त केली.

Municipal corporation has decided to sell the largest compony in the ahmednagar | नगरमधील सर्वात मोठी कंपनी महापालिकेने काढली विकायला

नगरमधील सर्वात मोठी कंपनी महापालिकेने काढली विकायला

अहमदनगर : मालमत्ताकराच्या ३ कोटी ३३ लाख ४८ हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनी अखेर लिलावात काढली आहे. कंपनीची मालमत्ता महापालिकेने आधीच जप्त केली होती. मात्र मालमत्ता जप्त करूनही थकबाकी न भरल्याने महापालिकेने सहा डिसेंबरला कंपनीचा लिलाव काढण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने सध्या मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठीची मोहीम तीव्र केली आहे. कायनेटिक कंपनीकडे महापालिकेची साडेतीन कोटी रुपयांची कराची थकबाकी आहे. यासाठी महापालिकेने आधी कंपनीला नोटीस दिली. त्यानंतर दिवाळीपूर्वीच कंपनीच्या आयटी विभागाला सील ठोकून मालमत्ता जप्त केली. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्हा न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. कंपनीचे दोन्हीही अपिल फेटाळण्यात आले. त्यानंतर महापालिकेने जप्त मालमत्तेचा लिलाव करण्याचा अखेर निर्णय घेतला. त्यानुसार सहा डिसेंबर ही तारीख महापालिकेने जाहीर केली आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांनी दिली. या लिलावात सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी पाच डिसेंबरपर्यंत लिलावात सहभागी होता येणार आहे. महापालिका आणि कायनेटिक कंपनी यांच्यामध्ये गेल्या ३० वर्षांपासून मालमत्ताकराच्या आकारणीच्या दराबाबत वाद असून ते न्यायप्रविष्ठ आहेत. याच वादावर गत आठवड्यात जिल्हा न्यायालयाने वाद निकाली काढत महापालिकेची कर आकारणीचे दर योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता.

Web Title: Municipal corporation has decided to sell the largest compony in the ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.