महापालिका स्थायी समिती : राष्ट्रवादीकडून मनोज कोतकर, शिवसेनेकडून योगिराज गाडे यांचा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 02:37 PM2020-09-24T14:37:53+5:302020-09-24T14:38:36+5:30
अहमदनगर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करीत सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे, तर शिवसेनेकडून योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. सभापतीपदासाठी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शुक्रवारी सकाळी मतदान घेण्यात येणार आहे.

कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. कोतकर हे सभापतीपदासाठी भाजपकडून निवडणूक लढणार होते. मात्र महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी ऐनवेळी राजकीय खेळी खेळत कोतकर यांना राष्ट्रवादीत घेऊन महापौर बाबासाहेब वाकळे यांना मोठा धक्का दिला आहे. महापालिकेत महापालिकेत भाजपची सत्ता आहे.
भाजपचे बाबासाहेब वाकळे हे महापौर आहेत. महापौर वाकळे हे स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडे घेण्यासाठी आग्रही होते. गेल्या तीन महिन्यांपासून कोतकर व वाकळे हे दोघे मिळून स्थायी समिती सभापती पदाची रणनीती आखत होते. स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्याबाबत त्यांनी राज्य पातळीवरही पाठपुरावा केला होता. परंतु ऐनवेळी कोतकर यांनीच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपची भूमिका काय असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे म्हणतात, नो कमेंट....
भाजपचे निष्ठावंत म्हणतात.... शहरातील भाजप ही राष्ट्रवादीच चालवत आहे.