महापालिकेचा शहरात धडक कारवाईचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:20 AM2020-07-07T11:20:19+5:302020-07-07T11:20:28+5:30
अहमदनगर: कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने कारवाईचा धडका सुरू केला असून, दक्षता पथकाने सोमवारी दिवसभरात ३५ हजार रुपयांचा दंड ...
अहमदनगर: कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने कारवाईचा धडका सुरू केला असून, दक्षता पथकाने सोमवारी दिवसभरात ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे नागरिकांकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम पावने लाख झाली आहे.
शहरासह उपनगरांतही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत़ सोमवारी नव्याने १३ रुग्ण सापडले आहेत. महापालिकेने उपाययोजना करण्याबरोबरच दुकाने वेळपूर्वी सुरू करणारे व मास्क न वापरणाºयांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. महापालिका व पोलिस यांचे संयुक्त पथक शहरात फिरत असून, त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे़ मास्क न वापरणाºयांना ५०० रुपये दंड केला जातो.
गेल्या तीन दिवसांत या पथकाने शहरात फिरून १ लाख ७५ हजा रुपयांचा दंड वसुल केला आहे़ याशिवाय रात्रीच्यावेळी रस्त्यांवर विनाकारण फिरणाºयांवरही कारवाई करण्यात येत आहे़ त्यासाठी महापालिका, महसूल आणि जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाºयांचे पथक नेमण्यात आले आहे.
शहर व परिसरातील २० ठिकाणी ही पथके तैनात करण्यात आली आले आहेत़ या पथकाकडूनही कारवाई करण्यात येत असून, यामुळे रात्रीच्यावेळी विनाकारण फिरणाºयांना चाप बसला आहे़ दक्षता पथकात पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, यंत्र अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी नरसिंग पैठणकर, उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान यांच्यासह कर्मचाºयांचा समावेश आहे.