स्वच्छ संगमनेरसाठी नगरपरिषदेचा पुढाकार
By Admin | Published: May 7, 2017 03:22 PM2017-05-07T15:22:14+5:302017-05-07T15:22:14+5:30
स्वच्छ संगमनेर उपक्रम हाती घेत नगरपरिषदेने ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहिमेस सुरुवात केली आहे़
आॅनलाईन लोकमत
संगमनेर (अहमदनगर), दि़ ७ - स्वच्छ संगमनेर उपक्रम हाती घेत नगरपरिषदेने ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहिमेस सुरुवात केली आहे़ शहर लवकरच ‘स्वच्छ व सुंदर’ होईल, असा विश्वास नगराध्यक्षा दुर्गा तांबे व्यक्त केला.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंंदर शहर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ याबाबत माहिती देताना तांबे म्हणाल्या, संगमनेर शहर स्वच्छ करण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्या वतीने अनेक उपाय योजना करण्यात येत आहे. शहरातील नागरीकांनी शहर स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे. नागरिकांनी कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे. प्लॅस्टीक मुक्त संगमनेर करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्लॅटीक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली असून कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.