महापालिकेचा ‘तो’ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:05 PM2021-02-17T12:05:07+5:302021-02-17T12:07:20+5:30
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपआरोग्यधिकारी डॉ.एन.एस. पैठणकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात एसीबीच्या नाशिकच्या पथकाकडून कारवाई सुरू झाली आहे. यात मोठी रक्कम आढळून आल्याची माहिती आहे.
अहमदनगर : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपआरोग्यधिकारी डॉ.एन.एस. पैठणकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात एसीबीच्या नाशिकच्या पथकाकडून कारवाई सुरू झाली आहे. यात मोठी रक्कम आढळून आल्याची माहिती आहे.
महापालिकेचे घनकचरा अधिकारी पैठणकर यांना लाचलुचपत प्रतिबं४क विभागाच्या अधिका-यांनी एका ठेकेदार कंपनीककडून लाच घेताना रंगेहाथ पकडले. पैठणकर हे चचेर्त राहिले आहेत. नगरसेवकांनी अनेकवेळा पैठणकर यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र आयुक्तांकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती.
लाचलुचपत पथकाने पैठणकर यांच्याकडून मोठी रक्कम हस्तगत केली आहे. पैठणकर यांनी कंपनी ठेकेदारांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील अडीच लाख रुपये घेताना पकडल्याची माहिती आहे.