खून करणारा आरोपी गजाआड; आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:29 PM2020-05-12T12:29:39+5:302020-05-12T12:30:31+5:30

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात कुºहाड घालून सतीष छबू यादव  या व्यक्तीचा भरदिवसा खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवीत पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून गोरख संपत यादव (वय ३९) यास अटक केली. आरोपीस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. 

Murder accused Gajaad; The accused was remanded in police custody for six days | खून करणारा आरोपी गजाआड; आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

खून करणारा आरोपी गजाआड; आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात कुºहाड घालून सतीष छबू यादव  या व्यक्तीचा भरदिवसा खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवीत पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून गोरख संपत यादव (वय ३९) यास अटक केली. आरोपीस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. 
 संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष छबू यादव (वय ३६) यास दुपारच्यावेळी घरातून बोलावून घेत पूर्ववैमनस्यातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुºहाड घालत सतीष छबू यादव यास जबर जखमी करण्यात आले. प्रकाश माधव यादव यांच्या यादववस्ती येथील राहत्या घरासमोर ही रविवारी भरदुपारी ही खुनाची घटना घडली. रक्तबंबाळ अवस्थेत सतीश यादव यास उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच सतीष यादव यांचा मृत्यू झाला होता. या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह कौठेकमळेश्वर येथे धाव घेतली. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.  त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या नेतृत्वाखालील हे. कॉ. लक्ष्मण औटी, विष्णू आहेर, राजू खेडकर, पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर, बाबा खेडकर, यमना जाधव, ओंकार शेंगाळ, लुमा भांगरे यांच्या पथकाने रात्रीच आरोपी गोरख संपत यादव यास कोकणगाव येथे अटक केली. 

Web Title: Murder accused Gajaad; The accused was remanded in police custody for six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.