शिर्डीत एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:56+5:302021-07-01T04:15:56+5:30

अज्ञात तरुणांच्या हल्ल्यात राजेंद्र आंतवन धिवर, (रा. राजगुरुनगर, शिर्डी) या चाळीस वर्षीय तरुणाचा बळी गेला. राजेंद्र धिवर हे संस्थानात ...

Murder of one in Shirdi | शिर्डीत एकाची हत्या

शिर्डीत एकाची हत्या

अज्ञात तरुणांच्या हल्ल्यात राजेंद्र आंतवन धिवर, (रा. राजगुरुनगर, शिर्डी) या चाळीस वर्षीय तरुणाचा बळी गेला. राजेंद्र धिवर हे संस्थानात कंत्राटी कामगार होते. मात्र सध्या काम नसल्याने ते मित्र संजय पवार यांच्यासोबत राहात्याला सेंट्रिंगच्या कामाला जात होते. मंगळवारी सायंकाळी ते राहात्यावरून परततांना ही घटना घडली. याबाबत संजय पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मंगळवारी सायंकाळी राहाता येथून सातच्या सुमारास सायकलवरून घरी परतत असताना नगर-मनमाड रस्त्यालगतच्या पटांगणात थकून बसले होते. त्यादरम्यान अठरा ते बावीस वयोगटातील चार अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आले. त्यांनी माचीसची मागणी केली. धिवर यांनी माचीस सायकलच्या सीटवर ठेवली. माचीस लवकर न दिल्याने आरोपींना राग आला. त्यातील एकाने राजेंद्र धिवर यांच्यावर धारधार शस्त्राने मानेवर, डोक्यावर व पोटावर वार केले. आरडा-ओरडा ऐकून लोक मदतीला धावल्याने आरोपींनी दोन दुचाकीवरून पळ काढला.

जखमी अवस्थेत धिवर यांना साईबाबा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचले. धिवर यांच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला.

...............

आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन

आरोपींच्या अटकेसाठी मयताच्या नातेवाईकांनी रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेऊ देण्यास विरोध केला. पोलिसांना सहकार्य केल्यास लवकरच आरोपी गजाआड करू अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दातरे करत आहेत.

Web Title: Murder of one in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.