दुर्मीळ औषधी वनस्पतींचे राहुरीमध्ये संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 04:23 AM2020-01-05T04:23:42+5:302020-01-05T04:23:48+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत येतात़
भाऊसाहेब येवले
राहुरी (जि. अहमदनगर): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत येतात़ १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींचे संवर्धन व्हावे व शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ६६० वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे़
राज्यात अभावाने आढळणाºया काही दुर्मिळ वनस्पती विद्यापीठाने जतन करून ठेवल्या आहेत़ विषारी प्राण्याने दंश केल्यास प्राथमिक उपचार म्हणून वापरली जाणारी अंकोळ औषधी वनस्पतीचे संवर्धन केले आहे़ अंकोळचा लेप लावला की ते विष ओढून घेते़ पांढºया डागावरही ही वनस्पती उपयुक्त आहे़ पोट विकारासाठी गोरख चिंच तर भद्राक्ष ही वनस्पती मुळव्याधीवर उपयुक्त आहे़
जखमेवर अर्जुन साताडा, कॅन्सरवर लक्ष्मण फळ, पोटाच्या व्याधीसाठी ब्रम्हानंद उपलब्ध आहे़ भिकाºयाचे वाडगे अर्थात कलाबक्ष ही वनस्पतीही उपलब्ध आहे़ कलाबक्षाच्या फळात साठविलेले पाणी पिल्यास पोटाचे विकार बरे होतात़ पूर्वीच्याकाळी भिक्षेकरी व साधू लोक कलाबक्षाचा वापर पाण्याची भांडे म्हणून करत.
औषधी प्रकल्पात दहा प्रकारच्या तुळशी आहेत़ ५० एकरावर साकारलेल्या प्रकल्पात नक्षत्र गार्डन आहे़ राशीनुसार वनस्पतींची लागवड केली जाते़ संजीवनी वाटीकामध्ये उंच व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे़ सुगंधी वनस्पतींपासून अर्क काढला जातो़ निलगिरीपासून काढलेला अर्क सर्दी, पडसे व डोके दुखी, सांधे दुखीसाठी थांबण्यासाठी उपयुक्त आहे़ जावा सेट्रोनीला या वनस्पतीपासून काढलेल्या अर्कचा उपयोग डास पळविण्यासाठी केला जातो़ याशिवाय फ्रेशनर म्हणूनही या अर्काचा होतो.
सुगंधी व औषधी प्रकल्पामध्ये आवळा, शतावरी, मेहंदी, शिकेकाई आदींचे चुर्ण तयार केले जातात़ विद्यापीठाला भेटी देण्यासाठी आलेले शेतकरी औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाला अवर्जून भेटी देतात़ सोबत वनस्पती, बियाणे व बनविले अर्क सोबत घेऊन जातात़ विभाग प्रमुख म्हणून अशोक जाधव, इनचार्ज प्रसन्न सुराणा, सहाय्यक गणेश धोंडे, विक्रम जांभळे कार्यरत आहेत़
>औषधी व सुगंधी प्रकल्पाला भेट देण्यासाठी विविध राज्यातून शेतकरी व परदेशी पाहुणेही येतात़ त्यांना वनस्पती जतन करण्याबरोबरच मार्गदर्शन केले जाते़ वर्षातून एकदा औषधी वनस्पतीसंदर्भात प्रशिक्षणही दिले जाते़ - गणेश धोंडे, औषधी व
सुगंधी वनस्पती प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी