खंबीर मनोबल आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:14 PM2019-09-06T12:14:57+5:302019-09-06T12:16:15+5:30
धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या करावी.
धर्म आराधनेत जप, तप, उपवासाला अनन्य साधारण महत्व असते. उपवासामुळे शरीर शुध्दींच नव्हे तर आत्मिक शुध्दी होते. जे तपस्वी श्रध्दाभाव ठेवून तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चर्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने जमेल तशी तपश्चर्या करावी.
मनोबल खंबीर असेल तरच कोणीही कठोर तप करु शकतो. कमकुवत मनाच्या व्यक्तीकडून तपाची अपेक्षा करता येत नाही. कोणत्याही तपस्या खंबीर मनोबलाने यशस्वी होते. त्यामुळे कर्मांचा नाश होतो. आत्मा उज्ज्वल बनविण्यासाठी तपाचा उपयोग होतो. चार्तुमासात केलेल्या तपसाधनेमुळे आत्मिक शुध्दीचा लाभ आधिक होतो. जैन धर्माच्या दृष्टीने चार्तुमासाला विशेष महत्व आहे.
धर्म आराधना करण्यासाठी संधी याकाळात मिळते. रखमामावशी चौधरी या अजैन महिलेने मासखमण केले त्यांची या धैर्याची कमाल आहे. त्यांचे हे तप धन्यवादास पात्र आहे. अजैन व्यक्तीने जैन धर्माचे पालन केले हा एक आदर्श आहे. त्यांनी तपश्चर्येत वाढ करावी अधिकाधिक तपसाधना करुन आत्मिक बल वाढविण्यास प्रयत्न करावा. मनात भक्ती असणे. गरिबांची सेवा करणे हे देखील एक तपश्चर्या आहे.
संतापुढे त्यांनी नतमस्तक व्हावे. ज्ञानी संत परमेश्वर यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे त्यामुळे ऊर्जा प्राप्त होईल. पडविकारांपासून दूर रहावे. तरच आत्मिक प्रकाश मिळेल. चुकीच्या गोष्टीबद्दल पश्चाताप झाला पाहिजे. अध्यात्मात मन एकाग्र करण्यासाठी उपासना करणे आवश्यक आहे. धर्मावर श्रध्दाभाव ठेवा. धर्मानुसार आचरण करा. सुखी जीवनाचा आनंद घ्यावा. प्रत्येक गोष्टीची निराकरण करण्याची शक्ती धैर्यात आहे. धर्माचा आदर करा. धर्म हा दिशादर्शक आहे, धर्मानुसार वागला तर शांतता व समृध्दीचे वातावरण निर्माण होईल. माणसा माणसातील संघर्ष संपतील. पृथ्वीतलावरील मानवजात सुखी होईल.सर्वंचे कल्याण होईल.
- पू. श्री. सन्मती महाराज