माझी लोकसभेची हौस फिटलीय : आमदार शिवाजी कर्डीले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 04:36 PM2019-02-21T16:36:51+5:302019-02-21T16:43:41+5:30

‘माझी लोकसभेची हौस आता फिटली आहे. त्यामुळे मी कधीही लोकसभा लढवणार नाही. आमदार औटी अभ्यासू आहेत. त्यांनी लोकसभा लढवावी, मी त्यांचे काम करेन’

My Lok Sabha debate furious: MLA Shivaji Cordillay | माझी लोकसभेची हौस फिटलीय : आमदार शिवाजी कर्डीले

माझी लोकसभेची हौस फिटलीय : आमदार शिवाजी कर्डीले

केडगाव : ‘माझी लोकसभेची हौस आता फिटली आहे. त्यामुळे मी कधीही लोकसभा लढवणार नाही. आमदार औटी अभ्यासू आहेत. त्यांनी लोकसभा लढवावी, मी त्यांचे काम करेन’, अशी आॅफर आमदार कर्डीले यांनी दिली.
नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार कर्डीले आणि विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्यात राजकिय कलगीतुरा रंगला.
‘आमदार कर्डीले मुरब्बी आहेत. मला पुढे काढून द्या म्हणजे तुमचा मंत्री पदाचा मार्ग मोकळा होईल, असे तुम्हाला वाटत असेन. पण मी लोकसभा लढणार नाही’ असा टोला आमदार औटी यांनी लगावला.
आमदार कर्डीले म्हणाले, औटी यांना कायद्याचे मोठे ज्ञान आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. ते लोकसभेत गेले तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. मला इंग्रजी, हिंदी येत नाही. मी दिल्लीत गेलो तर मोठा प्रश्न निर्माण होईल. तशीही माझी लोकसभा लढण्याची हौस आता फिटली आहे. आमदार औटी यांनी शिवसेनेकडून लोकसभा लढवावी. मी त्यांना पाठींबा देईल. तुम्ही विधासभेचे उपाध्यक्ष आहात. मला विधानसभेत बोलायला जास्त वेळ द्या.
या भाषणाला उत्तर देताना आमदार औटी यांनी चांगलेच चिमटे काढले. आमदार कर्डीलेंना राजकारणाचा मोठा अभ्यास आहे. राहुरी मतदार संघ त्यांचा आता पाठ झाला आहे. त्यांच्या निवडणुकीत या भागातील त्यांचे कार्यकर्ते राहुरीत जातात. हे माझ्यासाठी चांगलेच आहे. काम कसे करावे हे कर्डीले यांच्याकडून शिकावे. कर्डीले मुरब्बी आहेत. मला ते सभागृह अध्यक्ष आणि लोकसभेतून दिल्लीला पाठवू इच्छितात. मला पुढे पाठवले की त्यांचा मंत्रीपदाचा रस्ता मोकळा होईल, असे त्यांना वाटत असावे. त्यासाठी पूर्वीच मला कर्डी$ले आणि पालकमंत्री राम शिंदे यांनी एका कार्यक्रमात लोकसभा लढण्याची आॅफर दिली होती. पण मी आजच सांगतो, मी लोकसभा लढवणार नाहीच. कर्डीले साहेब तुम्हाला जे जमले नाही ते मला कसे जमणार ? तुम्ही भाषण फार छान करता. आता सभागृहात तयारी करून या. मी पहिल्या पाचमध्ये तुमचा नंबर लावतो.

यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार, रवी शिंदे, संभाजी पवार, संजय गेरंगे, बी.डी. कोतकर, लक्ष्मण नरवडे, भाऊसाहेब लांडगे, अंबादास शेळके, विकास रोहकले आदी उपस्थित होते.

योग्यतेनुसार संधी मिळते
मी किती शिकलो यापेक्षा मी पक्षासाठी काय केले याचा नेहमी विचार केला जातो. कोणाला काय द्यायचे, हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा आणि वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे. माझ्या पक्षाने मला सभागृहाच्या उपाध्यक्ष पदाची संधी दिली. ज्याची जशी योग्यता असते त्यानुसार पक्ष संधी देत असतो, असा खोचक टोला विधानसभा उपाध्यक्ष औटी यांनी कर्डीले यांना लगावला.

Web Title: My Lok Sabha debate furious: MLA Shivaji Cordillay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.