माझी वसुंधरा अभियान साईनगरीत गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:29+5:302021-01-22T04:19:29+5:30
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात ...
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात जल, वायू, आकाश, अग्नी, पृथ्वी या पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान सुरू झाले आहे. शिर्डी शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान गतिमान करण्यात आले आहे. शिर्डी शहराचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अव्वल नंबर येण्यासाठी नगर पंचायतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. त्याचाच एक भग म्हणून गुरुवार, २१ जानेवारी रोजी सातभाई मळा येथील नाल्याची सफाई करण्यात आली. नालासफाई केल्यानंतर सर्वांनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमास शिर्डी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक दत्तात्रय कोते यांचेसह शहरातील रवींद्र गोंदकर, अजित पारख, मनीलाल पटेल उपस्थित होते.