म्युकरमायकोसिस हा संसर्गामुळे होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:41+5:302021-06-01T04:15:41+5:30

श्रीरामपूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात १८० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, ...

Myocardial infarction is not caused by an infection | म्युकरमायकोसिस हा संसर्गामुळे होत नाही

म्युकरमायकोसिस हा संसर्गामुळे होत नाही

श्रीरामपूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात १८० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, असे असले तरी हा आजार संपर्कातून फैलावत नाही. त्यामुळे नागरिकांनी एकदम घाबरून जाण्याची गरज नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर नगर शहरातील आठ रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. यामध्ये आनंदऋषीजी, नोबेल रुग्णालय, साईदीप रुग्णालय व दोन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.

त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य रुग्णालयांमध्ये मात्र खासगी तत्त्वावरच रुग्णांना उपचार मिळत आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून सिव्हिल रुग्णालयातून रुग्णांना इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या इंजेक्शनचे मोफत वितरण केले जात आहे. अन्य रुग्णांना रुग्णालयाकडून आलेल्या चिठ्ठीप्रमाणे औषधे दिली जात आहेत. म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा आता कोणताही तुटवडा नाही, पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने औषध पुरवठ्याकरिता नियुक्त केलेले समन्वयक वसीम शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.

----------

औषधींचा पुरेसा साठा

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा कोणताही तुटवडा नाही. दररोज रुग्णांना १०० ते १५० इंजेक्शन पुरविले जात आहेत, असे वसीम शेख यांनी सांगितले.

------------

प्राथमिक लक्षणे

म्युकरमायकोसिस एवढा घातक व आक्रमक आहे की, आपल्याला सांभाळून घेण्याची संधीही देत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या आजाराचा संसर्ग नाक आणि जबड्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सायनसवर होतो आणि तेथून डोळ्यांकडे पसरतो. गंभीर परिस्थितीमध्ये मेंदूचा देखील समावेश होतो. डोळे, जबडा, नाक हे मेंदूपासून खूप जवळ आहेत.

--------

डॉक्टर काय म्हणतात

म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. एका व्यक्तीपासून तो दुसऱ्याला होण्याचा कोणताही संभव नाही. तो एक संधी शोधणारा आहे. कोविडमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांवर तो हल्ला करतो.

- डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नगर.

---------

वातावरणात बुरशीचे अस्तित्व आधीपासूनच आहे. मात्र, जेव्हा रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, तेव्हा त्याची वाढ होते. काळी बुरशी ही जास्त आक्रमक आहे. एस्परजिल्लस, कॅन्डीडीयासिस यांसारख्या इतर बुरशी कमी घातक आहेत.

-डॉ. प्रणयकुमार ठाकूर, सर्जन, श्रीरामपूर.

Web Title: Myocardial infarction is not caused by an infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.