माध्यमिक शिक्षक सोसायटीला नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:18 AM2021-01-22T04:18:58+5:302021-01-22T04:18:58+5:30

केडगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या आर्थिक कामगिरीचे नाबार्डच्या तपासणी अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. संस्थेकडून सभासदांना केला ...

NABARD officials visit Secondary Teachers Society | माध्यमिक शिक्षक सोसायटीला नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट

माध्यमिक शिक्षक सोसायटीला नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट

केडगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या आर्थिक कामगिरीचे नाबार्डच्या तपासणी अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. संस्थेकडून सभासदांना केला जाणारा कर्जपुरवठा, ठेवीमधील सातत्य, कॅश क्रेडिट पेक्षा कर्जावर तीन टक्के कमी व्याजदर आकारणी, सभासद हिताच्या योजना अशा उपक्रमांसाठी सोसायटीच्या व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

नाबार्डचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजेश अग्रवाल, शिलकर जगताप, जिल्हा बँकेचे बिगर शेती विभागाचे जनरल मॅनेजर एन. के. पाटील, जी. जे. कोकाटे, वाळूंजकर आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाबार्ड अंतर्गत तपासणी सध्या सुरु आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीस जिल्हा बँकेकडून पतपुरवठा होत असल्याने नाबार्डच्या तपासणी अधिकाऱ्यांनी सोसायटीस भेट दिली.

यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे यांनी नाबार्डच्या अधिका-यांचे स्वागत करून सोसायटीच्या कारभाराची माहिती दिली.

Web Title: NABARD officials visit Secondary Teachers Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.