नगर-औरंगाबाद महामार्गावर एस.टी. बसच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 07:17 PM2019-09-21T19:17:12+5:302019-09-21T19:17:56+5:30

रात्रीच्यावेळी महामार्ग ओलांडत असताना एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभूळवेढा शिवारात घडली.

On the Nagar-Aurangabad Highway, ST. Two killed in bus collision | नगर-औरंगाबाद महामार्गावर एस.टी. बसच्या धडकेत दोन ठार

नगर-औरंगाबाद महामार्गावर एस.टी. बसच्या धडकेत दोन ठार

 

नेवासा : रात्रीच्यावेळी महामार्ग ओलांडत असताना एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभूळवेढा शिवारात घडली.
 उल्हास कचरू इंगोले (वय ३५, रा.सोनखास.ता.मंगळूरपीर, जि.वाशीम) व परसराम तुकाराम काजळे, (वय ६१ रा.धनगरपुरा.ता.मंगळूरपीर, जि. वाशीम) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. एका खाजगी वाहनातून पुणे येथील भिडेवाड्यावरील मशाल मोर्चासाठी भीमराव मंडळीकर, भास्कर साहेबराव मुळे, संतोष दिनकरराव काळे, राहुल अंबादास राऊत, मंगल जयराम लबडे, वाहन चालक सुभाष दौलत चंदनशिवे, भिमराव उल्हास कचरू इंगोले,परसराम तुकाराम काजळे हे गेले होते. कार्यक्रमानंतर परतत असताना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या सर्वांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर बाभूळवेढा शिवारात हॉटेलमध्ये जेवण केले. जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उल्हास कचरू इंगोले, परसराम तुकाराम काजळे हे दोघे लघुशंकेसाठी महामार्ग ओलांडून पलिकडच्या बाजूला जात होते. यावेळी नगरकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाºया एस.टी.(एम.एच.२०, बी.एल.१७३७) बसने या दोघांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते. भीमराव उमाजी मंडळीकर (रा.मंगळूरपीर) यांनी नेवासा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एस.टी.बसचालक भाऊसाहेब संताराम थोरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण ठोंबरे करीत आहेत.

Web Title: On the Nagar-Aurangabad Highway, ST. Two killed in bus collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.