नगर जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी, बारावीचा निकाल ९२ टक्के, यंदा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:27 PM2020-07-16T13:27:04+5:302020-07-16T13:27:31+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९१. ९७ टक्के लागला.
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९१. ९७ टक्के लागला.
मागील वर्षी बारावीचा निकाल ८८.०७ टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालाचा टक्का वाढला आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. नगर जिल्ह्यात मुली उत्तीर्णचे प्रमाण ९६.१२, तर मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ८८.९३ टक्के आहे. पुणे विभागात मात्र नगर जिल्हा तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
जिल्ह्यातून ६५ हजार ५१३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ५८४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.