नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७९.५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:28 PM2019-06-09T12:28:04+5:302019-06-09T12:28:07+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ७९.५० टक्के लागला.

Nagar district's results of Class 10 results in 79.5 percent | नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७९.५० टक्के

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७९.५० टक्के

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ७९.५० टक्के लागला. गेल्या तीन वर्षांपासून नगरचा निकाल घसरत असून, यंदाही तिच परंपरा कायम राहिली. नगर जिल्हा पुणे विभागात थेट तिसऱ्या स्थानी फेकला गेला. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली. गेल्या वर्षीचा निकाल ९०.३० टक्के होता.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ७४ हजार १७३ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी ७३ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये ४१ हजार १८० मुले व ३२ हजार १९६ मुलींचा समावेश होता. यापैकी ५८ हजार ३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये ३० हजार ७४९ मुले व २७ हजार ५८७ मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७४.६७, तर मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ८५.६८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त निकाल (८३.७३ टक्के) पारनेर तालुक्याचा, तर सर्वांत कमी निकाल (७०.८४ टक्के) नेवासा तालुक्याचा लागला. एकूण ९७२ पैकी ५० शाळांचे निकाल १०० टक्के लागले.

१४ हजार २०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
नगर जिल्ह्यातील एकूण ७३ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १४ हजार २०२ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. याशिवाय २३ हजार ६४१ जण प्रथम श्रेणीत, १७ हजार २९६ द्वितीय श्रेणीत, तर ३ हजार १९७ विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.

३ रिपिटर प्रावीण्य श्रेणीत
४जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतील पुनर्परिक्षार्थींचा (रिपिटर) निकाल ३२.५५ टक्के लागला. जिल्ह्यातील २०१६ विद्यार्थ्यांनी पुनर्परिक्षार्थी म्हणून नोंदणी केली. यापैकी २ हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी ३ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. १८ जणांना प्रथम श्रेणी, १६ जण द्वितीय श्रेणीत, तर ६१४ जणांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.

Web Title: Nagar district's results of Class 10 results in 79.5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.