नगर फिल्म संस्कृती रुजलीय : रॉस क्लार्कसन, शेमीन नायर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 07:41 PM2019-03-02T19:41:43+5:302019-03-02T19:41:47+5:30
आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल आॅफ अहमदनगर निमित्ताने नगरमध्ये परदेशी लेखक आणि दिग्दर्शक आले आहे.
आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल आॅफ अहमदनगर निमित्ताने नगरमध्ये परदेशी लेखक आणि दिग्दर्शक आले आहे. यानिमित्ताने हाँगकाँग येथील रॉस क्लार्कसन आणि युनायटेड किग्डम येथील शेमीन भालचंद्र नायर यांच्याशी लोकमत अहमदनगर फेसबुक पेजवर अभिनेत्री साक्षी व्यवहारे यांनी संवाद साधला. अहमदनगरमधील फिल्म कल्चर नक्कीच कौतुकास्पद असल्याची भावना परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली.
प्रश्न : तुम्ही पहिल्यांदाचा भारतामध्ये आला आहात, तेही अहमदनगरमध्ये
रॉस : पहिल्यांदाच भारतामध्ये आलोय. खूप चांगला अनुभव आहे. गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगरमध्ये आहे. आणखी अभ्यास करत आहे. अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्वस आयोजित केला जातो, हे कौतुकास्पद आहे. जगभरातील चित्रपट या महोत्सवात पाहायला मिळत आहेत. माझा चित्रपट कॅपचर्ड पहिल्यांदाच या महोत्सवामध्ये दाखविण्यात आला.
प्रश्न : तुमच्या चित्रपट नेमका कशावर आधारित आहे.
रॉस: माझा चित्रपट घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. स्त्रियांवर होणा-या अत्याचारावर भाष्य केले आहे. स्त्रियांना अत्याचाराविरोधात उभे राहिले पाहिजे. स्त्रियांनी स्वत:चे अस्तित्व शोधून भुतकाळावर मात केली पाहिजे. सिनेमातून सकारात्मक भावना आणि उर्जा स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न : भारतातील आणि जागतिक समस्येबाबत तुमचं मत काय
रॉस : भारतातील कायद्याबद्दल मला जास्त माहित नाही. पण कौटुंबिक हिंसाचारातून महिलांची होणारी वाताहत ही जगभर आहे. प्रत्येक देशात सांस्कृतिक भिन्नता असली ती स्त्रियांना अजूनही व्यक्त होता येत नाही. जगभरातील समस्या सारख्याच आहेत.
शेमीन भालचंद्र नायर
प्रश्न : नगरमधील अनुभव कसा होता
नायर - शहर जास्त फिरता आले नाही. पण फेस्टीवलच्या माध्यमातून स्थानिक प्रेक्षकांशी संवाद साधता आला. त्यावरून शहर सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असल्याचे जाणवले.
प्रश्न : तुमचा चित्रपट टाईड आॅफ लाइजबद्दल थोडसं सांगा
नायर : आयुष्यात एखाद्या घटनेमुळे आपणामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. ते दुख आपण व्यक्त करु शकत नाही. त्यामुळे खचत जातो. या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी स्वत:चे कर्म उपयोगी पडते. त्यामुळे चांगले कर्म करणा-यांवर हा चित्रपट आहे.
प्रश्न : नगरमधील फिल्म कल्चरविषयी काय सांगाल
नायर : नगरमध्ये फिल्म संस्कृती रुचल्याचे दिसून आले. फिल्म फेस्टीवलचे त्यामध्ये योगदान असल्याचे दिसून येते. आंतररष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये स्टुडंट कॅटेगरीमध्ये आमची एक फिल्म असल्यामुळे आम्हाला मोठा आनंद झाला. पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी पहिल्यांदाचा स्टुंडट कॅटेगरी ठेवण्यात आली आहे. ही बाब आमच्यासाठी कौतुकास्पद होती. नक्कीच अशा फेस्टीवलमध्ये आम्हाला प्रेरणा मिळेल.