नगर मनपा निवडणूक २०१८ : पाच दिवसानंतर फक्त ९५ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:27 PM2018-11-18T17:27:24+5:302018-11-18T17:27:27+5:30
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवसाअखेर ६८९ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत
अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवसाअखेर ६८९ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. दिवसा सर्व्हर डाऊन असल्याने काही इच्छुकांनी रात्रीच आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत.
राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्याने प्रत्यक्षात अर्ज दाखल करणारांची संख्या कमी दिसते आहे.
महापालिका निवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली होती. शनिवार (दि. १७) अखेर ९५ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारपर्यंत २९ जणांनी ३३ अर्ज दाखल केले होते, तर ३२९ जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते.
शुक्रवारी सायंकाळ ते शनिवार सायंकाळपर्यंत आॅनलाईन अर्जात वाढ झाली आहे. म्हणजे सर्व्हर डाऊन असले तरी एका दिवसात ३६० जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल झाल्याचे दिसते आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी २४ तास संकेतस्थळ उपलब्ध असल्याने आॅनलाईन अर्जात वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला होता. शुक्रवारी ३३ अर्ज दाखल झाले होते. शनिवारी प्रत्यक्षात ६१ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये सावेडीत २२, शहरात २०, बुरुडगावला ४ आणि केडगावला १५ अर्ज प्राप्त झाले.