नगर मनपा निवडणूक २०१८ : चार प्रभागात अर्ज माघारीसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:42 AM2018-11-27T10:42:26+5:302018-11-27T10:42:29+5:30

चार प्रभागातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांचे अर्ज वैध झाल्यानंतर खंडपीठाच्या निर्देशानुसार तेथे सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Nagar Municipal Election 2018: Extension for withdrawal of applications in four divisions | नगर मनपा निवडणूक २०१८ : चार प्रभागात अर्ज माघारीसाठी मुदतवाढ

नगर मनपा निवडणूक २०१८ : चार प्रभागात अर्ज माघारीसाठी मुदतवाढ

अहमदनगर : चार प्रभागातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांचे अर्ज वैध झाल्यानंतर खंडपीठाच्या निर्देशानुसार तेथे सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या चार प्रभागात मंगळवारी (दि.२७) वैध झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामध्ये पाच जणांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांच्या नावासह ही यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीसाठी बुधवार (दि.२८) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८, ९, ११ आणि १२ मधील ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यापैकी दहा उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी खंडपीठात सुनावणी झाली. त्यामध्ये पाच जणांचे अर्ज वैध ठरले.
त्यांच्या नावांसह अंतिम यादी पुन्हा प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे ही यादी मंगळवारी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना गुरुवारी सकाळी चिन्हांचे वाटप होईल आणि त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह प्रसिद्ध होईल.
आज चिन्ह वाटप
चार प्रभाग वगळता अन्य सर्व १३ प्रभागात निवडणूक लढविणाºया उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी (दि. २७) प्रसिद्ध होणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे.

Web Title: Nagar Municipal Election 2018: Extension for withdrawal of applications in four divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.