नगर मनपा निवडणूक २०१८ : शिवसेनेच्या पहिल्या यादीत जुनेच चेहरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:59 AM2018-11-10T11:59:52+5:302018-11-10T11:59:55+5:30
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये जुन्याच चेह-यांना संधी देण्यात आली आहे.
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये जुन्याच चेह-यांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये १९ जणांना शिवसेनेने संधी देण्यात आली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी यादी जाहीर केली.
जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या दोेघांचा समावेश आहे. तसेच मनसेच्या एका नगरसेविकेचा समावेश आहे. विद्यमान महापौर सुरेखा कदम यांना प्रभाग क्रमांक १२ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय याच प्रभागातून राष्ट्रवादीमधून सेनेत दाखल झालेले चंद्रशेखर बोराटे, दत्तात्रय कावरे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून दीपाली नितीन बारस्कर, प्रभाग क्रमांक ४ मधून योगिराज शशिकांत गाडे, प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या कलावती शेळके, प्रभाग क्रमांक ७ मधून अशोक बडे व कमल सप्रे, प्रभाग क्रमांक ८ मधून रोहिणी शेडगे, पुष्पा अनिल बोरुडे, प्रभाग क्रमांक १३ मधून उमेश कवडे, सुभाष लोंढे, प्रभाग क्रमांक १४ मधून माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रभाग क्रमांक १५ मधून मनसेच्या सुवर्णा जाधव, विद्याताई खैरे, प्रभाग क्रमांक १६ व १७ मधून दिलीप सातपुते व मोहिनी लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पहिल्या यादीमध्ये नवखा एकही उमेदवार नसल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
युतीच्या आशा मावळल्या
शिवेसेनेने आघाडी घेत गुरुवारी पहिली यादी जाहीर केली. तर सोमवारी भाजपाकडून इच्छुकांच्या बैठकी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती होण्याची आशा जवळपास मावळलेल्या दिसत आहेत.