नगर मनपा निवडणूक २०१८ : मतदार याद्यांवर शिवसेनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:08 PM2018-11-01T14:08:13+5:302018-11-01T14:08:33+5:30

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचे विभाजन करून प्रभागानिहाय याद्या तयार करण्यात आल्या.

Nagar Municipal Election 2018: Shiv Sena's objection to voters lists | नगर मनपा निवडणूक २०१८ : मतदार याद्यांवर शिवसेनेचा आक्षेप

नगर मनपा निवडणूक २०१८ : मतदार याद्यांवर शिवसेनेचा आक्षेप

अहमदनगर : विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचे विभाजन करून प्रभागानिहाय याद्या तयार करण्यात आल्या. त्यामध्ये मोठा घोळ असून महापालिकेत दीड हजारांपेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या आहेत. एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्याचा नातेवाईक असलेल्या व त्याच राजकीय पक्षाशी संबंधित एका अधिकाऱ्याने मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ केला आहे. हा घोळ मिटल्याशिवाय निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
महापालिकेची निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये ज्या प्रभागात वास्तव्य आहे, त्या प्रभागात मतदारांची नावे नसल्याच्या मोठ्या प्रमाणावर महापालिकेत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनीही पत्रकार परिषदेद्वारे मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून त्यांचा संपूर्ण रोख राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे दिसते. एका प्रभागात किमान पाचशे ते बाराशे मतदारांची नावे दुसºया प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वात कमी मतदारांची संख्या आहे, तर प्रभाग क्रमांक १२, १३ या सारख्या अन्य प्रभागात लोकसंख्या आणि मतदारांची संख्या जवळपास सारखीच आहे. महापालिकेच्या अधिकाºयांनी मतदारांना फोडण्याचे काम केले आहे. मतदार याद्यांमध्ये मोठी गडबड आहे. मतदार नोंदणीचे काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांची (बीएलओ) मोठ्या प्रमाणावर अदला-बदल करण्यात आली आहे. एक अधिकारी एका विशिष्ट पक्षाशी संबंधित आहे. त्याची नावानिशी तक्रार करण्यात येईल. ज्या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्याच भागात वास्तव्य नसलेले मतदार घुसडविण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक आणि राजकीय गैरव्यवहार झाला आहे. काही भागात अधिकारी बुधवारी तपासणीसाठी गेले असता त्यांना हाकलून देण्यात आले आहे. संबंधित अधिकाºयावर कारवाई होईपर्यंत मतदार यादीची प्रक्रिया थांबविण्याची मागणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Nagar Municipal Election 2018: Shiv Sena's objection to voters lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.