भाजपाने निवडले चार 'आयाराम', इच्छुक जपताहेत राम नाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 04:26 PM2018-11-16T16:26:50+5:302018-11-16T20:22:14+5:30

भाजपच्या सहा, बाहेरच्या पक्षातून आलेल्या चार विद्यमान नगरसेवकांसह १५ जणांची पहिली यादी भाजपने गुरुवारी सायंकाळी जाहीर केली.

Nagar Municipal Election 2018: Six Corporators of BJP again get chance | भाजपाने निवडले चार 'आयाराम', इच्छुक जपताहेत राम नाम

भाजपाने निवडले चार 'आयाराम', इच्छुक जपताहेत राम नाम

अहमदनगर : भाजपच्या सहा, बाहेरच्या पक्षातून आलेल्या चार विद्यमान नगरसेवकांसह १५ जणांची पहिली यादी भाजपने गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. सावेडीतील प्रभाग क्रमांक पाचमधील चारही उमेदवार जाहीर करण्यात
आले असून अन्य प्रभागात एक किंवा दोन उमेदवार जाहीर झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली
आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने दोन-तीन दिवसांपूर्वी २६७ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर कोअर कमिटीने इच्छुकांच्या यादीची छाननी करून ती प्रदेशकडे पाठविली. त्यानंतर ही यादी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या मान्यतेने कोअर कमिटीने जाहीर केली.
गुरुवारी मुख्यमंत्री शनिशिंगणापूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
त्यानंतर दुपारी मनमाड रोडवरील पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात तिघांसह प्रा. भानुदास बेरड, अ‍ॅड. अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा यांची बैठक झाली. त्यांच्या सहीने दुपारी साडेचार वाजता पहिली १५ जणांची यादी जाहीर करण्यात आली.

यादीत एकूण दहा विद्यमान नगरसेवक
भाजपचे महापालिकेत सध्या नऊ नगरसेवक आहेत. त्यातील दत्ता कावरे यांनी सेनेत प्रवेश केला, तर श्रीपाद छिंदम याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. राहिलेल्या सातपैकी सहा विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. नगरसेविका मनीषा काळे-बारस्कर यांच्या ऐवजी त्यांचे पती सी.ए. राजेंद्र काळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. जाहीर नावांमध्ये सभापती बाबासाहेब वाकळे, महेश तवले, उषाताई नलवडे , मालन ढोणे, नंदा साठे, सुवेंद्र गांधी यांचा समावेश आहे. बाहेरच्या पक्षातून आलेल्या शारदा दिगंबर ढवण, मनोज दुलम, सुनीता भिंगारदिवे आणि किशोर डागवाले या चार नगरसेवकांचा समावेश आह

१५ उमेद्वारांची यादी
शारदा ढवण, अशोक कानडे (प्रभाग १), महेश तवले, उषाताई नलवडे (प्रभाग २), मनोज दुलम, सोनाबाई शिंदे, महेंद्र उर्फ भैय्या गंधे, आशा कराळे (प्रभाग ५), बाबासाहेब वाकळे (प्रभाग ६), सुनीता भिंगारदिवे (प्रभाग ७), मालन ढोणे (प्रभाग ९), नंदा साठे, सुवेंद्र गांधी (प्रभाग ११), शैलेश मुनोत (प्रभाग १२), किशोर डागवाले (प्रभाग १३)

प्रभाग पाच आघाडीवर
सावेडी भागातील प्रभाग क्रमांक पाच या एकमेव प्रभागात पूर्ण पॅनल जाहीर करण्यात आला आहे. या प्रभागात माजी नगरसेविका निलिमा बाळासाहेब गायकवाड व सोनाबाई तायगा शिंदे यांच्यात रस्सीखेच होती. त्यामध्ये शिंदे यांनी बाजी मारली आहे. प्रभाग १३ मध्ये एकमेव डागवाले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पुरुष-महिला गटात कोणी लढायचे? यावरून या प्रभागात संघर्ष निर्माण झाला आहे. अन्य प्रभागात केवळ एकच उमेदवार जाहीर झाल्याने अन्य उमेदवारांमध्ये एकमत झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच जाती समुहाच्या इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने काही प्रभागात पेच निर्माण झाला आहे.

Web Title: Nagar Municipal Election 2018: Six Corporators of BJP again get chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.